Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं रेडीरेकनरचे दर 31 मार्चला जाहीर होणार नाहीत

पोलीसनामा ऑनलाइन – महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला वाचवण्यासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे यंदा मार्च अखेरीस रेडीरेकनर दर जाहीर होणार नाहीत. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर दर जाहीर करण्यात येतील, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.दरवर्षी मार्च अखेरीस रेडीरेकनर दर जाहीर होतात, मात्र महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला वाचवण्यासाठी कार्यरत आहेत. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर दर जाहीर करण्यात येणार आहेत.

जीवनावश्यक वस्तू वेळेत आणि पुरेशा प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचतील यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. धान्याच्या ऐवजी थेट पीठ नागरिकांना कसे मिळेल याबाबतीतही ही सूक्ष्म नियोजन सुरू आहे. शेतीची कामे करण्यासाठी लॉकडाऊन मध्ये निर्बंध नाही. गव्हाची कापणी करण्यासाठी पंजाबहून जे हार्वेस्टिंग मशीन येथे आलेले आहेत, त्यांनाही पुरेशा इंधनाची उपलब्धता करून दिली जाईल, तशा सूचना आम्ही जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या आहेत. पेट्रोल पंपांवर हार्वेस्टिंग मशिनरीला इंधन दिले जाईल.

संपूर्ण लॉकडाउनला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांना अडवू नये अशा आशयाच्या सूचना राज्य शासनमार्फत प्रत्येक ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांची ओळख व्हावी यासाठी पासेसची उपलब्धता करून वाहतूक सुरळीत केली जात असल्याचे थोरात यांनी सांगितले.