Jio चा 444 रुपयांचा जबरदस्त प्लान, 112 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लान आणत असते. जिओकडे आपल्या ग्राहकांसाठी असे अनेक रिचार्ज प्लान आहेत. ज्यामध्ये 2GB डेटा रोज दिला जातो. जिओकडे 2599 रुपये 2399 रुपये, 444 रुपये आणि 249 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये 2 GB डेटा रोज दिला जातो. रिलायन्स जिओच्या 444 रुपयांच्या प्लानमध्ये कोणकोणते फायदे आहेत, याची माहिती जाणून घ्या.

जिओचा 444 रुपयांचा रिचार्ज पॅक

रिलायन्स जिओच्या 444 रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता 56 दिवसांची आहे. या पॅकमध्ये रोज 2GB डेटा दिला जातो. म्हणजेच ग्राहकांना एकूण 112 GB डेटा दिला जातो. रोज मिळणाऱ्या डेटाची लिमिट संपल्यानंतर 64 Kbps ची स्पीडने डेटा खर्च केला जाऊ शकतो. या प्लानमध्ये जिओ ते जिओ वर अनलिमिटेड आणि जिओवरून अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 2000 मिनिट्स ऑफर केले जातात. या पॅकमध्ये रोज 100 एसएमएस फ्री दिले जातात. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

याव्यतिरिक्त 249 रुपयांच्या रिचार्ज पॅकची वैधता 28 दिवसांची आहे. या पॅकमध्ये 2GB डेटा रोज मिळतो. याप्रमाणे 56GB डेटा मिळतो. तर 599 रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये 168 GB, 2399 रुपयांच्या प्लानमध्ये 730 GB आणि 2599 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये एकूण 740 GB डेटा मोळतो.