आदित्य ठाकरेंचा बचाव करण्यासाठी रोहित पवारांनी दिलं शेलार आणि चंद्रकांत पाटलांना ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचा एकही नेता महाविकास आघाडी वरती टीका करण्याची संधी सोडत नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपा प्रयत्न करते. आदित्य ठाकरेंना मंत्रिपद देण्यावरुन भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे, पण रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून विरोधी पक्षाला टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंनी कुठलाही अनुभव नसताना आपला मुलगा आदित्यला कॅबिनेट मंत्री केलं आहे. आता वहिनींना सामनाचं संपादक केलं आहे. त्या खूप चांगलं सांभाळतील असा चिमटा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काढला. यालाच उत्तर म्हणून रोहित पवार यांनी अनुभवापेक्षा आदित्य ठाकरेंनी केलेले काम बघा, एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू शकता. तसेच तुमच्या सत्ताकाळात मंत्रिपदाचाही अनुभव नसताना एका व्यक्तीला थेट मुख्यमंत्रिपद मिळाल्यामुळे तर तुम्ही अनुभवावर बोलत नाहीत ना? असं ट्विट करत रोहित पवार यांनी आदित्य ठाकरेंचा बचाव केला.

राष्ट्रवादीने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुंबई मिशन हाती घेतलं आहे, त्यावर आशिष शेलार म्हणाले, राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात ६० तर दुसरे म्हणतात ५० जिंकू, आहेत त्या ८ जागा टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येतं? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर, विनोदीच आहे सगळं, पालिकेत अबकी बार भाजपा सरकार असं म्हणत मुंबई मिशन या कार्यक्रमावर आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

सुरवातीला भाजपचे दोनच खासदार होते, आज पक्षासाठी आलेले अच्छे दिन हे तुमच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत. राज्यातील तुमच्या पक्षासाठी आलेले बुरे दिन हे याच अहंकाराचं फळ आहे. असं म्हणत आता तरी सुधरा असं रोहित पवार म्हणाले.