रोहित पवार पहिल्या फेरीत 3 हजार मतांनी आघाडीवर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पवार घराण्यातील तिसऱ्या  पिढीतील रोहित पवार यांनी कर्जत जामखेड या मतदार संघात भाजपाचे मंत्री राम शिंदे यांना जोरदार लढत दिली असून त्यांच्या विजयाची शक्यता व्यक्त केली जात आहे. रोहित पवार पहिल्या फेरीत ३ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मोठा पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतरही न डगमगता रोहित पवार यांनी आपले लक्ष कर्जत जामखेड येथे केंद्रीत केले होते. त्यांनी या मतदारसंघात गेल्या दोन वर्षांपासून काम केले असून संपूर्ण लक्ष इथे केंद्रीत केले होते. खासगी कारखाना व अन्य उद्योग व्यवसायातून त्यांनी तरुणांशी संवाद साधला आहे.

त्याशिवाय अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार यांनी या मतदारसंघात लक्ष ठेवून अनेक ठिकाणी सभा घेतल्या. त्यामुळे राम शिंदे हे अडचणीत आले असून रोहित पवार यांना विजय मिळू शकतो, अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरु आहे. रोहित पवार विजयी झाले तर तो भाजपा शिवसेना युतीला मोठा धक्का असेल.

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत.

Visit : Policenama.com