धक्कादायक ! ‘रेड लाइट’ एरियामध्ये नेण्यास नकार देणार्‍या टॅक्सी चालकावर RPF जवानाकडून ‘बलात्कार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका आरपीएफ जावानाने टॅक्सीचालकावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. रेल्वे सुरक्षा दलात कार्यरत असणाऱ्या जवानाने हे कृत्य केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. आरोपी आरपीएफ जवानाला वेश्या वस्तीत नेण्यास नकार दिल्यामुळे त्याने टॅक्सीचालकावरच बलात्कार केला. ही घटना शनिवारी (दि.11) रात्री घडली आहे.

आरोपी आरपीएफ जवान अमित धाकड असे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेल्या आरपीएफ जवानाचे नाव आहे. धाकड याची शनिवारी अकराच्या सुमारास ड्युटी संपली. त्यानंतर डीमेलो मार्गावर एका टँक्सीचालकाला ग्रँण्ट रोड येथील वेश्या वस्तीत नेण्यास सांगितले. मात्र, टॅक्सीचालकाने वेश्या वस्तीत जाण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या अमित धाकड या जवानाने टॅक्सीचलाकाला बेदम मारहाण केली.

टॅक्सीचालकाला बेदम मारहाण केल्यानंतर अमित धाकड याने त्याला रेल्वेच्या हद्दीतील निर्जन स्थळी नेले. या ठिकाणी त्याच्यावर अनैसर्गिक संभोग करत अत्याचार केले. यानंतर टॅक्सीचालकाकडील पैसे आणि टॅक्सीची चावी हिसकावून घेतली. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जवान अमित धाकड याला अटक करण्यात आली आहे. तर आपीएफने आरोपीला तडकाफडकी निलंबित केले आहे. आरोपीवर भादंवि 377, 394, 387, 341, 324, 504 आणि 506 (2) कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/