तपास यंत्रणेचा वापर करून सत्‍ताधारी पक्षांतर घडवताहेत : शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेनंतर राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकांसाठी मोठी तयारी करत आहेत. त्यात भाजप फोडाफोडीचे राजकारण करत असून त्यावर राष्ट्रावादीने त्यांच्यावर टीका केली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. तपास यंत्रणांचा धाक दाखवून सत्ताधारी इतर पक्षांमधील नेत्यांना सत्तांतरासाठी धमकावत आहेत आणि हे सूड आणि दबावाचे राजकारण लोकशाहीसाठी घातक आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. तसंच यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही गंभीर आरोप यावेळी केले.

देवेंद्र फडणवीस हे पक्षांतरासाठी आमदारांना स्वतः फोन करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला आहे. तसंच नेत्यांनी पक्षांतर करावे यासाठी सत्ताधाऱ्यांनी काही नेत्यांना फक्त धमकावण्याच्या कामाची जबाबदारी दिली आहे, असा आरोपही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. तसंच त्यांनी ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणांचा सरकार यासाठी वापर करत आहे, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ आणि हसन मुश्रीफ यांनाही सत्ताधाऱ्यांनी पक्षांतरासाठी धमकावल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसच हसन मुश्रीफ यांनी भारतीय जनता पक्षात जाण्यास नकार दिला होता, त्यामुळे त्यांच्या घरावर छापे टाकून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असंही त्यांनी म्हटलं. तंसच आमदार नेते पक्षांतर करण्यामागील कारणही त्यांनी स्पष्ट केले. ईडी आणि सीबीआयची चौकशी मागे लागल्यानेच हे नेते पक्षांतर करत आहेत, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

आरोग्यविषयक वृत्त –