‘मास्टर ब्लास्टर’ सचिनचा ‘गौप्यस्फोट’, ओपनिंगला जाण्यासाठी ‘लोटांगण’ घालावं लागत होतं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याला भारतातच नव्हे तर जगातील सर्वोत्तम फलंदाज समजले जाते. मात्र त्याने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला संघ व्यवस्थापनाला विंनती केली नसती तर कदाचित आज सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या खेळात इतका पुढे गेला नसता. त्याच्या खेळाच्या क्षमतेवर कुणालाही शंका नाही. मात्र यासाठी त्याला मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागले आहेत. मात्र त्याच्याकडे एक अशी आयडिया होती ज्याद्वारे तो प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर भारी पडत असे.

त्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने सांगितले कि,1994 मध्ये ज्यावेळी मी भारतीय संघासाठी सलामी फलंदाज म्हणून खेळण्यास सुरुवात केली त्यावेळी सगळे जण आपली विकेट राखण्यासाठी खेळत असतं. मी मात्र काही तरी वेगळे करण्याचे ठरवले होते. त्यामुळे मी त्यांच्यावर पुढे जाऊन फटके खेळू लागलो. मात्र मला यासाठी मोठ्या विनंत्या आणि लोटांगण घालावे लागले होते.

सलामीला खेळण्यासाठी मला एक संधी मिळण्यासाठी मला हे सर्व करावे लागले होते, याची माहिती त्याने या व्हिडिओमध्ये दिली आहे. त्याने आपले शब्द खरे करत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात 49 चेंडूत 82 धावांची आक्रमक खेळी करत सलामी फलंदाज म्हणून आपली जागा नक्की केली. त्यानंतर मला कधीही सलामीला खेळण्यासाठी विचारण्याची गरज पडली नाही. मात्र अयशस्वी होण्यापासून कधीही घाबरू नका असा सल्लादेखील त्याने या व्हडिओमधून दिला.

दरम्यान, सचिन तेंडुलकर याने आपल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत 200 कसोटी सामने तसेच 463 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याचबरोबर विक्रमी 100 शतकांचा रेकॉर्ड देखील सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. त्याने 2012 मध्ये एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती स्वीकारली होती तर 2013 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.

 

Visit : policenama.com