Sambhajiraje Chhatrapati – Swarajya – Lok Sabha 2024 | स्वराज पक्ष लोकसभेच्या सर्व 48 जागा लढवणार – छत्रपती संभाजीराजे

Sambhajiraje Chhatrapati

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Sambhajiraje Chhatrapati – Swarajya – Lok Sabha 2024 | आगामी लोकसभा 2024 च्या निवडणूकीचे रणशिंग फुंकले गेले असून सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यामध्ये देखील लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले असून माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. दरम्यान, ते सध्या महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. आज (दि.15) त्यांनी पंढरपूरमध्ये दौरा केला. यावेळी त्यांनी स्वराज पक्षाची बांधणी करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी माध्यमांसमोर देखील मत व्यक्त केले. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्वराज पक्ष उतरणार असल्याबद्दल आणि तयारीला लागले असल्याबद्दल सूचक वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. (Sambhajiraje Chhatrapati – Swarajya – Lok Sabha 2024)

स्वराज पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत स्वराज पक्ष उतरणार असल्याचे सांगितले आहे. कोणत्या आघाडीत जायचे याबाबत अजून काहीच ठरवलेले नसल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्यावेळी ज्या पद्धतीची समीकरणे बनतील ते पाहून ऐनवेळी आघाडीबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या संभाजीराजे छत्रपती हे अॅक्शनमोडमध्ये आले असून आपल्या पक्षवाढीसाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. (Sambhajiraje Chhatrapati – Swarajya – Lok Sabha 2024)

माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले की, ते सध्या राज्यभर दौरे करून पक्षाची ताकद वाढवत असून पक्ष बांधणीची एकच लाईन ठरवली आहे. त्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संभाजीराजे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेबद्दल उत्तर देताना स्वराज पक्ष सर्व 48 जागा लढवणार असल्याचे सांगत राजेंनी सूचक विधान केले.

सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे
यांनी 96 कुळी मराठ्यांना कुणबी मधून आरक्षण नको असे वक्तव्य केले होते.
यावर प्रतिक्रिया विचारली असता या वक्तव्याबद्दल मला माहित नाही असे म्हणून संभाजीराजे यांनी बोलणे टाळले. पुढे ते म्हणाले की, “राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. आरक्षण देणार असाल तर ते टिकणारे असावे. महाराष्ट्र हा बहुजन समाजाचा असून राजर्षी शाहू महाराजांनी 1902 मध्ये बहुजनांना आरक्षण दिले होते. त्यावेळी त्यांची भूमिका ही सर्व बहुजन समाज एका छताखाली राहावा अशीच होती. छत्रपती शिवाजी महाराजांनीही अठरापगड जातींना एकत्रित केले होते. मराठा आणि ओबीसी हे भाऊ असून काही मंडळी हे वातावरण बिघडवत असल्याचा घणाघात संभाजीराजेंनी केला. यावेळी स्वराज पक्षाचे जिल्हाध्यक्ष महादेव तळेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dhangar Reservation | धनगर आरक्षणाचे आंदोलक संतप्त, विखे-पाटील न आल्याने सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

Pune Metro- Ganeshotsav 2023 | पुणेकरांनो लाडक्या बाप्पाला आणा मेट्रोमधून, पुणे मेट्रोकडून नियमावली जाहीर

ACB Trap Case | PhonePe वर लाच घेणाऱ्या विशेष वसुली व विक्री अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक

ऑनलाइन टास्क देत तरुणाची 31 लाख 30 हजारांची फसवणूक, हडपसरमधील प्रकार

पत्नीला मारहण करणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका, घरात प्रवेश बंदी

Nashik Crime News | पती, पत्नी आणि त्याची गर्लफ्रेण्ड…, सततच्या छळा वैतागून तिनं उचललं टोकाचं पाऊल; नाशिक शहरात खळबळ

ACB Trap Case | ग्रॅज्युटीच्या फरकाची रक्कम देण्यासाठी लाच घेताना उपकोषागार अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Total
0
Shares
Related Posts