
Sangli Crime News | विजेचा शॉक लागून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; सांगली जिल्ह्यातील घटना
सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime News | विजेचा शॉक (Electric Shock) लागून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime News) आटपाडीमध्ये घडली. अनिकेत अमृत विभुते Aniket Amrut Vibhute (वय 24 रा. माडगुळे ता.आटपाडी) आणि विलास मारुती गूळदगड Vilas Maruti Guldagad (वय 45 रा.शेवते ता.पंढरपूर जि.सोलापूर (Pandharpur – District Solapur) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अनिकेत विभूतेची माडगुळे येथे शेती (Agriculture) आहे. त्यासाठी आटपाडी तलावातून 12 किलोमीटरची पाईपलाईन करुन पाणी नेले आहे. तराफ्याद्वारे विद्युतपंप (Electric Pump) पाण्यात सोडला आहे. गुरुवारी दुपारी अनिकेत आणि त्याच्या मावशीचे पती विलास दोघेही तलावाकडे गेले होते. तलावातील पाणी कमी झाल्याने पंप बाहेर आल्याचे दिसले. तो आणखी खाली सोडण्यासाठी दोघेही पाण्यात उतरले. यावेळी वायर शॉर्ट होऊन दोघांनाही विजेचा धक्का (Electric Shock) बसला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू (Sangli Farmers Death) झाला.
Sangli Crime News
दरम्यान, तलावाजवळच्या काही लोकांनी ही घटना पाहताच घटनास्थळी धाव घेतली.
वीजप्रवाह बंद करुन दोघांनाही तलावातून बाहेर काढले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) दाखल केले असता उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
Raigad Irshalwadi Landslide | इर्शाळगड येथे बचाव मोहिमेचा दुसरा दिवस; आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू
Asthma In Monsoon | पावसाळ्यात वाढत आहे अस्थमाचा धोका, अशी घ्या काळजी
Petrol-Diesel Price Today | तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर किती? जाणून घ्या