NCP च्या संग्राम जगतापांनी काढला लोकसभेचा वचपा, शिवसेनेच्या उमेदवारासह श्रीपाद छिंदमचा केला पराभव

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर शहरातील निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. गेल्या लोकसभेला पराभव झाल्याने राष्ट्रवादीचे संग्राम जगताप विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. संग्राम जगताप यांनी शिवसेनेच्या अनिल राठोड यांचा 11,139 मतांनी पराभव केला आहे.

शिवसेनेच्या अनिल राठोड यांना 70,078 मते तर राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना 81,217 मते मिळाली. तर 2,724 मते नोटाला मिळाली आहेत.

अहमदनगर शहर मतदारसंघ

संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस) – 81,217 मते, विजयी उमेदवार
अनिल राठोड (शिवसेना) – 70,078 मते
असिफ सुलतान (एम आय एम ) – 6,869 मते
किरण काळे (वंचित बहुजन आघाडी ) – 2,850 मते
श्रीपाद छिंदम (बसपा ) – 2907 मते

Visit : Policenama.com