मुलाला कडेवर घेऊन चक्क टेनिस कोर्टावर उतरणार्‍या सानियाला पाहून हैराण झाला ‘हा’ अभिनेता, दिली अशी प्रतिक्रया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची प्रसिद्ध महिला टेनिसपटू सानिया मिर्झा अशा लोकांमध्ये सामील आहे जे की रूढीवादी परंपरांना झुगारून नेहमीच पुढे सरसावले आहेत. महिला एका कामासोबतच अनेक कामे आणि जबाबदाऱ्या पूर्ण करू शकते, याबाबत सानिया मिर्झाचे हा फोटो सांगून जातो, हा फोटो सानिया मिर्झाने ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सानिया मिर्झा आपला मुलगा इजानला कडेवर घेऊन टेनिस कोर्टमध्ये उतरली आहे.

मुलाला कडेवर घेऊन टेनिस कोर्टवर उतरली सानिया मिर्झा:
फोटोत सानिया मिर्झाच्या एका हातात रॅकेट आणि दुसऱ्या बाजूने कडेवर मुलगा आहे. हा फोटो शेअर करत सानियाने लिहिले की हे माझे आयुष्य आहे, याशिवाय माझ्याकडे दुसरा मार्ग नाही, अलहम्दुलिल्लाह, हे इंडोनेशियाच्या विरुद्ध खेळाच्या काही काळापूर्वीचे आहे, याने मला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी खूप प्रेरित केले आहे.

सानियाचे हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत आणि देशातील लोकांनी या भारताच्या मुलीला सलाम करून तिचे कौतुकही केले आहे. सानियाच्या या ट्विटला अभिनेता रितेश देशमुख याने रिट्वीट करत लिहिले की ‘परफेक्ट पिक्चर’ रितेशच्या या ट्विटवर खूप साऱ्या प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

विशेष म्हणजे सानिया मिर्झाने आठ वर्षापूर्वी २०१० मध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न केले होते, हे संबंध सोपे नव्हते, कारण सानिया भारतीय आहे तर शोएब पाकिस्तानी आहे. त्यामुळे या नात्याबद्दल खूप राग व्यक्त करण्यात आला होता.

पण सानिया-शोएबने प्रत्येक विरोधाचा सामना केला आणि लोकांना सांगितले, जिथे प्रेम आणि विश्वास असतो तिथे फक्त प्रेम जन्माला येत असते आणि सानिया-शोएबच्या घरी आलेला हा छोटा पाहुणा याचेच एक उदाहरण आहे. सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकचे इजान हे पहिले अपत्य आहे, सानिया-शोएबने मुलाच्या जन्मापूर्वीच हे स्पष्ट केले होते की मुलाचे आडनाव मिर्झा-मलिक असेल, त्यामुळे या मुलाचे नाव इजान मिर्झा मलिक असे आहे.