काय सांगता ! होय, 4 महिन्यात सानियानं केलं तब्बल 26 किलो वजन कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची महिला टेनिस पटू सानिया मिर्झाने चार महिन्यात तब्बल 26 किलो वजन कमी केले आहे. आई होण्यापूर्वी सानियाचे वजन 89 किलोवर पोहचले होते त्यानंतर वजन कमी करण्यासाठी सानियाने अथक प्रयत्न केले आणि वजन 63 किलोवर आणून ठेवले. सानियाने सोमवारी आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवरून दोन फोटो शेअर केले आहेत. यामधील एक फोटो आई झाल्यानंतरच आहे आणि एक फोटो सध्याचा वजन कमी केलेला आहे.

हे फोटो शेअर करत सानियाने लोकांना फिटनेस विषयी जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी 89 किलो झाले 63′ अशा प्रकारचे कॅप्शन सानियाने लिहिले आहे. तसेच हे सध्या करण्यासाठी मला चार महिने लागले असल्याचे देखील सानियाने यावेळी सांगितले.

https://www.instagram.com/mirzasaniar/?utm_source=ig_embed

आई झाल्यानंतर सानियाने सांगितले होते की,तिला लवकरात लवकर टेनिसच्या मैदानावर परत यायचे आहे त्यामुळे तिने यावेळी सर्वांना आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवण्याचा संदेश दिला आहे.