दिवाळीनंतर टप्याटप्याने शाळा सुरु करणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा तसेच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दिवाळी(diwali) नंतर टप्याटप्याने शाळेचे वर्ग सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( School Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. तसेच सरसकट शाळा सुरु करून विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या आरोग्याशी खेळले जाणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

दि. 15 ऑक्टोंबरपासून शाळा सुरु करायच्या की नाही. याचा निर्णय राज्यातील परिस्थिती आणि सरकारची तयारी पाहून राज्य सरकारने घ्यावा, असे केंद्राच्या अनलॉक 5 च्या मार्गदर्शक सुचनांमध्ये म्हटले आहे. त्याप्रमाणे आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. इयत्ता 9 ते 12 या वर्गातील विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने या वर्गाचा प्रामुख्याने शाळा सुरु करण्याचा विचार केला जाईल असे त्या म्हणाल्या.