५ व्या रांगेत स्थान दिलेल्या महाराष्टातील ‘या’ बड्या नेत्याची शपथविधीला दांडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पार पडलेल्या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमाला दांडी मारली. त्यांना शपथविधी कार्यक्रमात अगदी पाचव्या रांगेत स्थान देण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेत बहुमत मिळाल्यानंतर त्यांनी आज दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यावेळी देशभरातून वेगवेगळ्या नेत्यांसह विदेशातील नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. बीमस्टेक राष्ट्रांच्या प्रमुखांसह देशातील बॉलीवूड अभिनेते, उद्योजकांनी हजेरी लावली. त्यासोबतच काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्यासह सोनिया गांधी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मात्र या कार्यक्रमाला गैरहजर होते. दोनवेळा केंद्रीय मंत्री राहिलेले आणि ज्य़ेष्ठ नेते असलेल्या शरद पवारांना चक्क पाचव्या रांगेत स्थान देण्यात आले. त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार या कार्यक्रमासाठीच दिल्लीत दाखल झाले होते. त्याआधी राहूल गांधी यांनी त्यांची भेट घेतली. परंतु शरद पवार यांनी अनेक महत्त्वाची पदं भुषवलेली असतानाही त्य़ांना पाचव्या रांगेत स्थान देण्यात आले. बारामती येथे आल्यावर नरेंद्र मोदी यांनी मी शरद पवार यांचं बोट पकडून राजकारण शिकलो असे वक्तव्य केले होते. परंतु यावेळी त्यांनी शरद पवारांना जाणूनबूजून हे स्थान दिलं असावं असा आरोप करण्यात आला आहे.