मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. मुंबईतील नियोजित सर्वच कार्यक्रम सोडून ते राजधानी दिल्लीला रवाना झाले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यानंतर आता शरद पवार दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi Government) सातत्याने अस्थीर करण्याचा प्रयत्न केंद्रातील सरकारकडून (Central Government) होत असल्याचा आरोप भाजप नेते करत आहेत. परंतु काहीही झालं तरी हे सरकार पाचवर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून व्यक्त होत आहे. मात्र, पहाटेच्या शपथविधीमुळे राजकारणातील अनिश्चितता सातत्याने वेगळ्या चर्चा घडवून आणते. आता, शरद पवार अचानक दिल्लीला रवाना झाल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आगामी काळात होत असलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसंदर्भात हा दिल्ली दौरा आहे का,
आणखी काही वेगळेच कारण आहे, याची चर्ची सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.
परंतु शरद पवार यांचा दिल्ली दौरा हा पूर्वनियोजित होता,
त्यात तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या देखील दिल्लीत आहेत.
त्यामुळे काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
त्यासाठीच शरद पवार दिल्लीला रवाना झाल्याचे राष्ट्रवादीच्या (NCP) सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
Web Title :- Sharad Pawar | After Chandrakant Patil and Devendra Fadnavis, Sharad Pawar left all the planned events in Mumbai and left for Delhi; Political discussions abound
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update