पुणे पोलिसांनी जे काही केलं ते सूडभावनेनं केल्याचं दिसत : शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एल्गार परिषदेवर झालेल्या कारवाईवर भाष्य केलं. एल्गार परिषदेच्या भाषणावरून आणि कवितांवरून त्यांना देशद्रोही ठरवणं चुकीचं आहे. समाजिक कार्यकर्ते, साहित्यिक यांना तुरुंगात डांबून ठेवणं चुकीचं आहे असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं.

माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “एल्गार परिषदेच्या भाषणावरून आणि कवितांवरून त्यांना देशद्रोही ठरवणं चुकीचं. समाजिक कार्यकर्ते, साहित्यिक यांना तुरुंगात डांबून ठेवणं चुकीचं आहे. सत्तेचा गैरवापर करत ही कारवाई झाली आहे. सरकारनं अशा प्रकारे सत्तेच गैरवापर का करावा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “स्पेशल एसआयटीची स्थापना करून एल्गार परिषदेची चौकशी करावी. पुणे पोलिसांनी जे काही केलं ते सूडभावनेनं केल्याचं दिसत आहे.” असंही पवार म्हणाले

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, “सत्तेचा गैरवापर करत साहित्यिकांवर कारवाई का? पुणे पोलिसांचं वागणं अत्यंत आक्षेपार्ह आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिकांच्या मुलभूत स्वातंत्र्यावर पोलिसांनी गदा आणली. त्यांनी केवळ टीका केली म्हणजे ते देशद्रोही आहेत असं म्हणणं चुकीचं आहे” असंही पवार म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/