संजय राऊत, शरद पवार, राज ठाकरे एकाच मंचावर येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar), शिवसेना (shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे तीन दिग्गज नेते एकाच मंचावर दिसणार आहेत. प्रख्यात लेखक अंबरिश मिश्र यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी हे दिग्गज राजकीय नेते एकाच व्यासपीठावर येण्याची चिन्हं आहेत. ठाकरे आणि पवार हे राज्यातील दोन ब्रँड असल्याचा उल्लेख करत काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.

‘चौकात उधळले मोती’ या अंबरिश मिश्र लिखित पुस्तकाचं प्रकाश होणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि राज ठाकरे यांना या सोहळ्यासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

यापूर्वी राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांची जाहीर मुलाखत घेतली होती. राज ठाकरे यांनी 2017 मध्ये पुण्यात शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. महामुलाखत चांगलीच गाजली होती. शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली आणि त्यांच्या अमृतमहोत्सव वर्षांच्या निमित्ताने पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर ही मुलाखत घेण्यात आली होती. तर संजय राऊत यांनी सामनासाठी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती.