शरद पवारांनी 3 महिन्यांपुर्वीच दिला होता ‘हा’ इशारा, सरकारनं केली चूक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कांद्याची दरवाढ होण्यास केंद्र सरकार जबाबदार आहे. दरवाढ कमी होण्यासाठी आता तुर्कीतून कांदा आयात करण्याची चूक सरकार करत असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कांद्याच्या भाववाढीविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की   , ‘कांद्याच्या दरवाढीबाबत आपण केंद्राला याची जाणीव करून दिली होती असं त्यांनी म्हणाले. तीन-चार महिन्यांपूर्वी शेतकरी कांदा रस्त्यावर फेकत होते. पण सरकारने कांद्याला भाव दिला नाही. परिणामी शेतकऱ्यांनी दुसरी पिके घेतली आणि आता तुर्कीतून कांदा आयात करण्याची वेळ आली. हे करून सरकारने चूक केली आहे. सगळ्यांविषयी मी तीन महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. त्यात हे असं घडेल असा इशारा दिला होता.’

बाजारातील कांद्याची आवक घटून कांद्याचे भाव भडकले आहेत. देशाच्या विविध भागांत किरकोळ बाजारात कांद्याचा भाव प्रतिकिलोमागे सव्वाशे ते दीडशे रुपयांपर्यंत पोहचला आहे. कांदा निर्यातीवर बंदी घालताना कांद्याची आयात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असतानाही अद्याप कांद्याचे भाव नियंत्रणात आलेले नाहीत.

Visit : Policenama.com

You might also like