शरद पवार उद्या फोडणार नातवाच्या प्रचाराचा नारळ

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – मावळमधून पार्थ पवार यांची काल शुक्रवारी राष्ट्रवादीने लोकसभेची उमेदवारी जाहीर केली . शरद पवार यांच्या हस्ते उद्या रविवारी सांयकाळी पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ पिंपरी चिंचवड या ठिकणी फोडण्यात येणार आहे. यावेळी शरद पवार जाहीर सभेला देखील संबोधित करणार आहेत.

पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका पार पडल्या असून त्या बैठकांमध्ये निवडणुकीची रणनीती कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यातआली आहे. पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकतीने लढण्याचा निर्धार केला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार सुरुवातीला तयार नव्हते मात्र त्यांनी त्यानंतर स्वतःची उमेदवारी मागे घेत नातवाची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी स्वतःची उमेदवारी माघारी घेतल्यावर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर चांगलीच सडकून टीका केली आहे. मात्र शरद पवार यांनी सावध पवित्रा घेऊन नातवाच्या प्रचाराची रणनीती तयार केली आहे. अशात पार्थ पवार यांच्या उमेदवारी वरून पवार कुटुंबात नाराजी असल्याच्या देखील बातम्या माध्यमात झळकल्या आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून पवार कुटुंबात कसलीच नाराजी नसल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like