‘थर्डक्लास’ राजकारण ! ‘या’ सर्व तमाशापेक्षा हुकूमशाहीच आणा, अभिनेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अधिकच वाढत गेला आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सत्तास्थापनेच्या चाललेल्या या राजकीय नाटकावरून अभिनेते शरद पोंक्षे यांनी फेसबुकवर ‘थर्डक्लास राजकारण’ असे लिहित त्यांनी संताप व्यक्त केला आहे . तसेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘यापेक्षा हुकूमशाही आणा’, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

हा लोकशाहीचा मोठा अपमान –
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना शरद पोंक्षे म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती ही फार भयानक आहे, मन विषण्ण करणारी आहे. परस्परविरोधी विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करु लागले तर मग हा लोकशाहीचा फार मोठा अपमान आहे. लोकशाहीनं आपल्याला मतदानाचा अमूल्य अधिकार दिला आहे.

ज्या पक्षाची विचारसणी आपल्याला पटते किंवा ज्या विचारसरणीचे नेते सत्तेत यावं असं आपल्याला वाटतं, त्या पक्षाला आपण मत देतो. मात्र निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी जर परस्पर विरोधी विचारसरणीचे पक्ष मिळून सत्ता स्थापन करू लागले तर मग हा लोकशाहीचा फार मोठा अपमान आहे. लोकांच्या मतांचा हा अनादर आहे. ही लोकशाही संपूर्णपणे अपयशी ठरली असं म्हणावं लागेल.

‘भाजपाने जे केलं ते घृणास्पद आहे. एवढ्या पहाटे लपून-छपून शपथविधी पार पाडण्याची गरजच काय? जाहीरपणे आम्ही मतदान केलंय तर सत्तासुद्धा उजेडात जाहीरपणे यावी. हे सगळं पाहून सामान्य माणसाची निराशा झाली आहे. या देशात हुकूमशाही आणावी असं माझं मत आहे. किमान हा सर्व तमाशा तरी होणार नाही. मतदानाचा आणि लोकशाहीचा हा तमाशा बंद करा’, असंही शरद पोंक्षे म्हणाले.

या’ सर्व तमाशापेक्षा हुकूमशाहीच आणा-
महाराष्ट्रातील राजकारणात विधानसभा निवडणुकांपासूनच दररोज एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपसोबत हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्री बनले.

त्यांनतरआज मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील असं ट्विट अजित पवारांनी केलं आहे.

 

Visit : Policenama.com