कौतुकास्पद ! मुलगा बनून अनेक वर्ष तिनं क्रिकेट खेळलं, आता बनली टीम इंडियाची ‘धुव्वाधार’ फलंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात भारताकडून खेळणाऱ्या हरियाणाच्या रोहतक मधील शेफाली वर्मा ने 51 रणांची खेळी करत विजयामध्ये आपले महत्वाचे योगदान दिले. त्यानंतर शेफाली वर्मा चांगलीच चर्चेत आली आहे. एक अशी वेळ देखील होती जेव्हा शेफाली मुलगा बनून टीममध्ये खेळात होती. शेफाली ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी मुलींसाठी कोणतीही अकॅडमी नव्हती आणि मुलांच्या अकॅडमीमध्ये खेळण्यास तीला मनाई करण्यात आली होती.

Image result for shefali verma

त्यानंतर शेफालीच्या वडिलांनी निर्णय घेतला की, शेफाली केस कापून अगदी मुलांप्रमाणे त्या अकॅडमीमध्ये खेळेल आणि त्यानंतर अनेक वर्ष शेफाली मुलगा बनून त्या ठिकाणी क्रिकेट खेळली. शेवटी शेफाली आणि तिच्या वडिलांच्या मेहनतीचे चीझ झाले आणि भारतीय महिला क्रिकेट संघात शेफालीची निवड झाली आणि पहिल्याच डावात 46 रणांची महत्वाची खेळी करून शेफालीने सगळ्यांना प्रभावित केले.

शेफालीच्या वडिलांचे रोहतकमध्ये ज्वलरीचे दुकान आहे त्यांनी सांगितले की शेफालीचा प्रवास खूप कठीण होता अनेकदा लोकांनी याबाबत शेफालीची निंदा देखील केली होती. मात्र आता एकदम स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे.