शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास राज्यात पुन्हा निवडणूका होऊ शकतात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचा निकाल लागून आता आठवडा उलटून गेला आहे मात्र अद्याप कोणत्याच पक्षाने सत्ता स्थापनेसाठी दावा केलेला नाही. शिवसेना मात्र आमचाच मुख्यमंत्री होणार असा दावा करत आहे. संजय राऊत देखील वारंवार पत्रकार परिषद घेऊन भाजपवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच जर शिवसेनेने सत्ता स्थापन केली तर ते सरकार जास्त काळ टिकणार नाही आणि राज्यात पुन्हा निवडणूका घ्याव्या लागतील असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केले आहे.

शिवसेनेला सत्तेत सामील समान वाटा हवा आहे तशी मागणी देखील सेनेकडून वारंवार करण्यात आली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पद देऊ असे कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून भाजपवर वारंवार दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय.

मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचे संजय राऊत वारंवार बोलत आहेत. भाजपला उद्देशून बोलताना राऊत यांनी सांगितले की, जे ठरलं आहे ते भाजपने करावे जर कोणी राष्ट्रपती राजवट लावण्याचे षडयंत्र रचत असेल तर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यावर अपमान असेल असे देखील राऊत म्हणाले.

सत्ता स्थापनेच्या चर्चेसाठी आमची दार खुली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते मात्र तरीही शिवसेना आपल्या वक्तव्यावर ठाम आहे. शरद पवारांनी विरोधात बसण्याचे ठरवले असल्याने शिवसेनेसाठी सत्तेसाठीचा मार्ग अजून खडतर होणार आहे.

Visit : Policenama.com