बेपत्ता पत्नी-मुलाची तक्रार नोंदवत नव्हता ‘ठाणेदार’, ‘परेशान’ झालेल्यानं त्यानं पोलिस स्टेशन समोरच स्वतःला पेटवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशातील शिवपुरीमध्ये पोलिसांच्या हलगर्जीपणाला कंटाळून एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या व्यक्तीला रुग्णालयात जखमी अवस्थेत सोडत पळ काढला. यावेळी पोलीस स्टेशनला कळवले असता पोलीस उपनिरीक्षकांनी यासंदर्भात काहीही माहित नसल्याचे म्हटले आहे.

पत्नी आणि मुलाला मैनपुरीला पाठवले
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीचे नाव राजेश जाटव असून त्याने मागील गुरुवारी आपल्या पत्नीला आणि मुलाला मैनपुरीला जाणाऱ्या बसमध्ये बसवून दिले होते. मात्र ते त्या ठिकाणी पोहोचले नाहीत. खूप शोधल्यानंतर देखील ते दोघेजण मिळून न आल्यानंतर त्याने पोलिसांमध्ये याची तक्रार दाखल करण्यासाठी गेला, मात्र त्याची कोणत्याही ठिकाणी तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यामुळं शेवटी त्याने पेट्रोल ओतून घेत स्वतःला जाळून घेतले. त्याला पेटलेले पाहून पोलीस घाबरले. त्यांनी तात्काळ त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याला उपचारासाठी दाखल करण्याऐवजी त्यांनी त्याठिकाणी त्याला सोडून फरार झाले.

महिला शिवपुरीमध्येच बसमधून उतरली
ज्या बसमधून त्याची पत्नी आणि मुलगा गेले होते त्या बसच्या कंडक्टरने दिलेल्या माहितीनुसार,महिला मुलाला घेऊन शिवपुरीमध्येच उतरली होती. मात्र त्याने शोध घेतला असता त्याला ते मिळून आले नाही. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार न घेतल्याने त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले.
दरम्यान, सध्या राजेश याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. यासंबंधी तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Visit : Policenama.com