इतिहासामधील ‘वीभत्स’ पान ! ‘सौंदर्य’ अबाधित ठेवण्यासाठी ‘या’ महाराणीनं केलं होतं तब्बल 600 हून जास्त कुमारिका मुलींच्या रक्तानं स्नान

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  इतिहासात अशा अनेक कथा आणि रहस्य पुरले आहे, जे आपल्या समोर आल्या तर धक्का बसेल. अशीच एक महाराणी होती, जिच्या कारनाम्यांमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. गोथ असण्यासोबतच ही महाराणी सिरीयल किलर देखील होती. या राणीची कहाणी ऐकून नक्कीच तुमच्या अंगावर हा शहारे येतील. ही महाराणी कुमारिका मुलींना मारून त्यांच्या रक्ताने स्नान करत असायची. जाणून घेऊया यामागील कारण …

हंगेरीत राहणाऱ्या या राणीचे नाव एलिझाबेथ बाथरी असे होते. एलिझाबेथ बाथरी ही इतिहासातील सर्वात खतरनाक आणि सिरियल किलर महिला म्हणून ओळखली जात होती. 1585 ते 1610 च्या दरम्यान बाथरीने 600 हून अधिक मुलींची हत्या करून त्यांच्या रक्ताने आंघोळ करायची. असे म्हटले जाते की, कोणीतरी एलिझाबेथला तिचे सौंदर्य टिकवण्यासाठी कुमारी मुलींच्या रक्ताने स्नान करण्याचा सल्ला दिला. एलिझाबेथला ही पद्धत इतकी आवडली की तिने क्रौर्याची मर्यादा ओलांडली. माहितीनुसार, ती मृत मुलींच्या शरीराचे मांस दाताने काढून घेत असे. एलिझाबेथ बाथरीच्या या भयंकर गुन्ह्यात तीचे तीन नोकर तिला पाठिंबा देत असे.

दरम्यान, एलिझाबेथ बाथरी हंगेरियन राजघराण्याची होती. एलिझाबेथचे लग्न तुर्क विरुद्ध युद्धात हंगेरीचा राष्ट्रीय नायक असलेला फेरेंक नैडेस्डी नावाच्या माणसाशी झाले होते. मुलींना आपल्या तावडीत अडकविण्यासाठी एलिझाबेथने मोठा कट रचत असे. एक उच्च व्यक्तिमत्त्व असलेली महिला असल्याने ती जवळच्या खेड्यातील गरीब मुलींना चांगल्या पैशाच्या लालसेने तिच्या राजवाड्यात बोलावत असत. पण मुली राजवाड्यात येताच त्यांची शिकार केली जात असे. दरम्यान, जेव्हा परिसरातील मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली तेव्हा तिने उच्च कुटुंबातील मुलींची शिकार करण्यास सुरवात केली. जेव्हा हंगेरीच्या राजाला हे कळले तेव्हा त्याने या प्रकरणाची चौकशी केली. जेव्हा तपासक एलिझाबेथच्या राजवाड्यात पोहोचले तेव्हा तेथील परिस्थिती पाहून ते स्तब्ध झाले. तपास पथकाने एलिझाबेथच्या राजवाड्यातून अनेक मुलींचे सांगाडे व सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले.

1610 मध्ये, एलिझाबेथला तिच्या घृणास्पद गुन्ह्यासाठी अटक केली गेली. या दुष्कृत्यासाठी एलिझाबेथला फाशी देण्यात आली नव्हती, परंतु तिला स्वत: च्या राजवाड्यातील एका खोलीत तुरूंगात टाकण्यात आले, तेथे चार वर्षांनंतर 21 ऑगस्ट 1614 रोजी तिचा मृत्यू झाला.