मोदी, मोदी असा नारा देत घातला दरोडा, कुटुंबाला केली मारहाण

सिवान (बिहार) : वृत्तसंस्था – दरोड्याची एक विचित्र प्रकारची घटना समोर आली आहे. विचित्र यासाठी की दरोडेखोरांनी गावात येताच मोदी, मोदी अशा घोषणा दिल्या आणि आणि त्यानंतर घरावर दरोडा टाकला. एढ्यावरच ते थांबले नाहीत तर मोदी, मोदीच्या घोषणा देत कुटुंबातील सर्वांना बेदम मारहाण केली. ही घटना बिहारमधील सिवान जिल्ह्यातील घुरघाट गावात घडली.

घुरघाट गावात काही गुंडांनी मोदी मोदीचा नारा देत एका घराचा दरवाजा ठोठावला. घरातल्यांनी दरवाजा उघडताच गुंडांनी घरात प्रवेश करत लुटमार केली. या कुटुंबातील उपेंद्र राज सांगितात, दरोडेखोरांनी मोदी, मोदीचा नारा दिला. आम्ही दरवाजा उघडल्यानंतर ते घरात आले. प्रथम त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी घरातील इतर सदस्यांनाही मारहाण केली.

दरवाजा उडताना आम्हाला वाटले की प्रचार करण्यासाठी कोणी तरी आले असेल. पण दरवाजा उघडताच त्यांनी घरात प्रवेश केला. त्यांनी दोन महिला आणि दोन पुरुषांना बेदम मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. दरोडेखोरांनी घरातील लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उपेंद्र यांनी सांगितले. या घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीसाठी एक पथक तयार करण्यात आले आहे.