PM मोदी सारखे ‘यशस्वी’ लोक का घेतात काही तासांचीच झोप, रिसर्चमध्ये झाला खुलासा

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – रोज किमान आठ तास झोप घ्यायला हवी असे वारंवार सांगितले जाते. त्यामुळे शरीर निरोगी राहते आणि माणूस प्रगती करू शकतो. मात्र प्रगती करून यशस्वी झालेले अनेक मोठे लोक केवळ काही तासांचीच झोप घेतात यामुळेच त्यांच्या काम करण्याचे तास आणि झोपण्याचे तास यामध्ये खूप फरक जाणवतो. यामध्ये पंतप्रधान मोदींपासून ते बाराक ओबामा अशा अनेक बड्या नावांचा समावेश आहे कारण हे लोक देखील दिवसातील केवळ तीन ते चार तास झोप घेतात.

या आणि अशा प्रकारच्या कमी झोपणाऱ्या अनेक यशस्वी लोकांचे एक खास वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे असे कमी झोपणारे लोक नेहमीच जोश आणि उत्सहात असतात. 2009 मध्ये सेन फ्रान्सिस्कोच्या युनिव्हरसिटीमध्ये केल्या गेलेल्या रिसर्चनुसार कमी झोप घेणाऱ्यांमध्ये डीईसी 2 हा घटक असतो. परंतु सामान्य झोप घेणाऱ्यांमध्ये या गोष्टी आढळून येत नाहीत.

जाणून घेऊयात कमी झोप घेणाऱ्या यशस्वी व्यक्तींबद्दल

नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी अनेक वर्षांपासून कमी वेळ झोपतात. मात्र डॉक्टरांनी त्यांना पाच तासापेक्षा कमी झोप न घेण्याचा सल्ला दिला आहे. पण ते पहाटे 4 वाजता उठतात. मोदी फक्त 3 ते 4 तास झोपतात.

बिल गेट्स
बिल गेट्स माइक्रोसॉफ्टचे चेअरमॅन आणि एक यशस्वी व्यक्तिमत्व आहे. ते देखील दिवसातील सात तास झोप घेतात. रात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत झोपतात.

रिचर्ड ब्रेनसन
रिचर्ड हे वर्जिन ग्रुपचे अध्यक्ष आहेत या समूहामध्ये ऐकून चारशे कंपन्यांचा समावेश आहे. एवढे यशस्वी असून देखील रिचर्ड केवळ पाच तास झोपतात.

इंदिरा नूरी
भारतात जन्मलेली इंदिरा पेप्पी कंपनीची अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. त्या सुद्धा दिवसातील केवळ पाच तास झोप घेतात.

टीम कुक
अँपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि ते देखील केवळ सात तास झोपतात.

अशा प्रकारे बहुतांशी यशस्वी लोक हे केवळ चार ते पाच तास झोप घेणारे आहेत. बाकी वेळ ते आपल्या बहुमूल्य कामासाठी देतात.

 

फेसबुक पेज लाईक करा –