Coronavirus : देशात 24 तासात ‘कोरोना’मुळे 194 जणांचा बळी तर 6566 नवे रुग्ण, बधितांचा आकडा 158333

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – देशभरात गेल्या २४ तासात उच्चांकी १९४ कोरोना बाधितांचा मृत्यु झाला आहे. त्यातील निम्म्यांहून अधिक मृत्यु म्हणजे १०५ मृत्यु हे महाराष्ट्रात झाले आहेत. आतापर्यंतच्या ६० दिवसात एकाच दिवसात मृत्यु पावलेल्यांची ही सर्वाधिक संख्या आहे.

गेल्या २४ तासात देशात ६ हजार ५६६ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १ लाख ५८ हजार ३३३ इतकी झाली आहे. त्यापैकी ८६ हजार ११० रुग्ण हे अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर देशातील विविध रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

गेल्या २४ तासात देशभरात १९४ कोरोना बाधितांचा मृत्यु झाला असून आतापर्यंत देशातील ४ हजार ५३१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यापूर्वी ४ मे रोजी देशभरातील १७५ रुग्णांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथम रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

बुधवारी दिवसभरात देशभरातील ३ हजार २६६ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत देशातील ६७ हजार ६९२ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. यापूर्वी १६ मे रोजी एकाच दिवसात सर्वाधिक ३ हजार ९६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते.