खाकीवर डाग ! महिलेसमोर नग्न होणारा पोलीस अटकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई पोलीस दलात खाकी वर्दीला लाजविणारी घटना घडली आहे. नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेसमोर एक पोलीस कॉन्स्टेबल नग्न झाला आणि तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले. त्यामुळे या महिलेने नेहरूनगर पोलीस ठाण्यात पोलीस कॉनस्टेबल हरिशचंद्र लहाने (वय-४३) याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या घटनेची शहानिशा करून पोलिसांनी कॉन्स्टेबल लहाने याला अटक केली आहे.

पीडित महिला शुक्रवारी (दि.१०) घराच्या बाल्कनीत बसली होती. त्यावेळी समोरच्या घरात राहणाऱ्या लहाने याने महिलेला पाहून अश्लील शेरेबाजी केली. काही वेळाने तो घरात गेला. पुन्हा बाहेर येऊन त्याने नग्न होऊन तिच्याकडे पहात अश्लील चाळे केले. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने पोलीस नियंत्रण कक्षास फोन करून मदत मागितली. पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पथकाने घटनेची चौकशी करून लहाने याला अटक केली.

हरिशचंद्र लहाने हा पंत नगर पोलीस ठाण्यात कार्य़रत आहे. मात्र मागील तीन महिन्यांपासून तो गैरहजर असून त्याला दारूचे व्यसन असल्याची माहिती वरिष्ठांकडून सांगण्यात आली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like