Ram Temple : जगातील सर्वात मोठं ‘तिर्थस्थळ’ बनू शकतं ‘राम मंदिर’, ‘मक्का’ आणि ‘व्हेटिकन सिटी’पेक्षा असेल ‘भव्यदिव्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्यामध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बॅनरखाली राम मंदिराचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासंबंधीची पहिली बैठक झाली आहे. आता 15 दिवसानंतर राम मंदिर निर्माणाची तारीख जाहीर करण्यात येईल.

जगातील सर्वात मोठे मंदिर

मीडिया रिपोर्टनुसार, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने म्हटले आहे की, राम मंदिर जगातील सर्वात मोठे असेल. जे मक्का आणि व्हेटिकन सिटीपेक्षा मोठे असू शकते. ट्रस्टच्या सदस्यांना वाटते की, राम मंदिराचा विस्तार मक्का आणि व्हेटिकन सिटीपेक्षा मोठा असला पाहिजे.

मिळालेल्या माहितीनुसार, जर मक्का मशिदीबाबत बोलायचे तर ती 99 एकरात पसरलेली आहे. तर दुसरीकडे ईसाई नागरिकांचे तीर्थस्थळ असलेली व्हेटिकन सिटी 110 एकरमध्ये पसरलेली आहे. ट्रस्टला वाटते की, हिंदुेचे धार्मिकस्थळ सर्वात मोठे असले पाहिजे. जे जगातील सर्वात मोठे केंद्र बनावे.

मंदिर निर्माणची तारीख ठरलेली नाही

माहितीनुसार, श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टने अजूनपर्यंत अयोध्यामधील भव्य राम मंदिरच्या निर्माणाची तारीख ठरवलेली नाही. 2 एप्रिलपासून कामाची सुरूवात होऊ शकते. तारीख ठरवण्यात अनेक अडचणी आहेत आणि ट्रस्ट ते सर्व मुद्दे सोडवण्यासाठी काम करत आहे.

ट्रस्टच्या सूत्रांनी सांगितले की, रामनवमीच्या मुहूर्तावर अयोध्यामध्ये 15 ते 20 लाख लोक येतील. त्या दिवशी मंदिर निर्माणची प्रक्रिया सुरू करणे अवघड आहे. कारण प्रशासनासाठी गर्दी नियंत्रित करणे आणि राम जन्मभूमी स्थळाकडे जाण्यापासून गर्दीला रोखणे एक आव्हान होऊ शकते.

ट्रस्टच्या सूत्रांनी म्हटले की, 67 एकर जमीनीला समतोल करण्यात मोठा कालावधी लागणार आहे. मागील 30 वर्षापासून कुणालाही रामलला मंदिर परिसरात जाण्याची परवानगी नाही. यासाठी कुणालाही येथे कशी स्थिती आहे हे माहित नाही. याचा आढावा घेतल्याशिवाय कोणतीही तारीख ठरवणे शक्य नाही.

याशिवाय सुरक्षेच्या कारणामुळे मंदिर निर्मिती ताबडतोब सुरू करता येणार नाही. कारण सुरक्षा यंत्रणांच्या परवानगीशिवाय काहीही करणे शक्य नाही. निर्माण कार्य सुरू करण्यापूर्वी रामलला यांना अन्य ठिकाणी ठेवले पाहिजे आणि यासाठी सुरक्षा यंत्रणांची परवानगी घ्यावी लागेल, यासाठी काही वेळ लागू शकतो.