धुळे : जुनी पेन्शन लागु व्हावी यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे क्युमाईन क्लब समोर निदर्शने

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने 8 जानेवारी 2020 रोजी कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपाचा इशारा सरकारला दिला आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सविस्तर माहिती की, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने जुनी पेन्शन योजना त्वरीत लागु करावी, पाच दिवसांचा आठवडा व सेवा निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे अशा विविध मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Dhule
आज शुक्रवारी दुपारी भोजन अवकाश काळात राज्य सहकारी कर्मचारी, शिक्षक संघटना वतीने जुनी पेन्शन योजना, केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात यावे, पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा अशांसह अन्य पंधरा मागणीसाठी क्युमाईन क्लब समोर जोरदार घोषणा देत शासनाचा निषेध करत निदर्शने करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांना पंधरा लेखी मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील, अशोक चौधरी, एस यु तायडे, पोपट चौधरी, राजेश कुलकर्णी सह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/