बोगस कंपन्यांच्या आडून 1100 कोटींचा GST घोटाळा, मुंबईच्या 12 फर्मच्या कानपूर कनेक्शनचा खुलासा

कानपूर : वृत्त संस्था  – बोगस कंपन्यांच्या आडून बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेणार्‍यांच्या विरोधात देशभरात अभियान सुरू आहे. दिल्लीनंतर मुंबईत 2300 कोटीच्या जीएसटी घोटाळ्यात तीन लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आढळलेल्या बोगस कंपन्यांचे कनेक्शन कानपूरमध्ये असल्याचे दिसून आले आहे.

जीएसटी कौन्सिलच्या निर्देशानंतर बोगस कंपन्यांवर लागोपाठ कारवाई केली जात आहे. सप्टेंबरमध्ये सेबीने सुद्धा कानपूरच्या 100 बनावट कंपन्यांद्वारे घोटाळा उघड केला होता. मुंबईतील छाप्याच्या दरम्यान आढळलेली अरमान ट्रेडिंग कंपनी, मार्शल मल्टीवेंटर्स, आयकिया इन्फ्रासह 12 फर्ममधून सप्लाय कानपुर दाखवण्यात आले आहे. या फर्मसद्वारे 1100 कोटी रूपयांचा जीएसटी घोटाळा करण्यात आला आहे. छाप्यांच्या दरम्यान खुलासा झाला की, सप्लायशिवायच आयटीसी वसूल करण्यात आला होता.

कानपुरच्या पत्त्यावर नोंदवण्यात आलेल्या 14 कंपन्यांशी सर्क्युलर ट्रेडिंग करण्यात आले होते. यांच्या द्वारे आपसात बनावट ट्रेडिंग दाखवण्यात आले होते. कुणाकडून खरेदी तर कुणाला सप्लायर दाखवण्यात आले होते. अशाप्रकारे कागदावर व्यवहार अनेक पटीने वाढवण्यात आला आणि या आधारावर बँकांकडून मोठे कर्ज घेण्यात आले. या खेळाला सक्युर्लर ट्रेडिंग म्हटले जाते. एसजीएसटीचे अ‍ॅडीशनल कमिश्नर एसआयबी केपी वर्मा यांनी सांगितले की, कौन्सिलच्या निदेशानंतर देशभरात बनावट कंपन्यांच्या विरोधात अभियान सुरू आहे. एसजीएसटी लागोपाठ बोगस कंपन्या आणि चुकीच्या पद्धतीने आयटीसी घेणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करत आहे. मुंबईत बनावट कंपन्यांच्या विरोधात अ‍ॅक्शन सीजीएसटीच्या तपास विभागाने घेतली आहे.