मोदी सरकार आता खालिस्तान्यांचं कंबरडं मोडणार, खालिस्तान समर्थक 12 वेबसाईट्स ‘ब्लॉक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मोदी सरकारने खलिस्तान समर्थक संघटनांशी संबंधित 12 वेबसाइटवर बंदी आणण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी सांगितले, की बंदी घातलेल्या काही संकेतस्थळांवर ‘शीख फॉर जस्टीस’ (एसएफजे) या बेकायदेशीर संस्था थेट काम करतात. वेबसाइट्सवर खलिस्तान समर्थक सामग्री होती.

नाव न छापण्याच्या अटीवर एका स्त्रोताने सांगितले, की “इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत 12 वेबसाइटवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. ” इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे भारतातील सायबर स्पेसवर नजर ठेवण्याचे अधिकार आहेत.

एसएफझेडए4 फार्मर्स, ‘पीबीटीम,’ ‘सेवा 413’, ‘पीबी4यू,’ या प्रतिबंधित वेबसाइट्सपैकी काही आहेत.

यापैकी काही बंदी घातलेल्या संकेतस्थळांचा शोध घेत असताना, आता संदेश येत आहे, ‘तुम्ही विनंती केलेल्या यूआरएलला भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या सूचनांनुसार बंदी घातली गेली आहे. अधिक माहितीसाठी प्रशासकाशी संपर्क साधा. ‘

गृहमंत्रालयाने गेल्या वर्षी देशविरोधी कार्यांसाठी एसएफजेवर बंदी घातली होती. जुलैमध्ये सरकारने ‘एसएफजे’ च्या 40 वेबसाइटवर फुटीरतावादी कारवायांना पाठिंबा दिल्याबद्दल बंदी घातली होती.