नाग पंचमी : धन-संपदा, समृद्धी प्राप्तीसाठी करा पूजा, बनतोय विशेष ‘योग’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  प्रत्येक वर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीच्या दिवशी नागपंचमीचा सण साजरा केला जातो. यावेळी 25 जुलै 2020 ला देशभरात नागपंचमी साजरी केली जाईल. उत्तर फाल्गुन नक्षत्रानंतर हस्त नक्षत्र असेल. यादरम्यान मंगळ वृश्चिक लग्नात होत असलेला खास योग हा आहे की, या दिवशी भगवान कल्की यांची जयंती सुद्धा आहे.

नाग पंचमीच्या दिवशी नाग देवतेच्या स्वरूपांची पूजा केली जाते. नाग देवतांची पूजा केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि हवे असलेले वरदान देतात. याशिवाय ज्या जातकांवर कालसर्प दोष आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवस खुप महत्वाचा मानला जातो.

असे म्हटले जाते की, या दिवशी सापांची पूजा केल्याने नाग देवता प्रसन्न होते आणि कालसर्प दोषातून मुक्ती मिळते. ज्या जातकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे, त्यांनी तर विशेषकरून नागपंचमीत पूजा-अर्चना केली पाहिजे.

नागपंचमीचे देव

नागपंचमी पूजा आणि व्रताचे आठ नागदेव मानले गेले आहेत – अनन्त, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट आणि शंख नावाच्या अष्टनागांची पूजा केली जाते. नागपंचमीवर वासुकी नाग, तक्षक नाग आणि शेषनागची पूजा करण्याची पद्धत आहे. यावेळी नागपंचमी श्रावण महिन्याच्या 25 जुलैला शनिवारी साजरी केली जाईल.

नागपंचमीचे महत्व

हिंदू धर्मात मान्यता आहे की, सर्प हाच धनाचे रक्षण करतो. यासाठी धन-संपदा व समृद्धीच्या प्राप्तीसाठी नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी श्रीया, नाग आणि ब्रह्म अर्थात शिवलिंग स्वरुपाची पूजाअर्जा फलदायी ठरते. साधकाला धनलक्ष्मीचा आशिर्वाद मिळतो.

का साजरी केली जाते नागपंचमी

नागपंचमी साजरी करण्यामागे अशी अख्यायिका आहे की, समुद्र मंथनानंतर जे विष निघाले ते प्राशन करण्यास कुणीही तयार नव्हते. अखेर भगवान शंकरांनी ते प्राशन केले. भगवान शंकर जेव्हा विष पित होते, तेव्हा त्यांच्या तोंडातून विषाचे काही थेंब खाली पडले आणि सर्पाच्या तोंडात गेले. यानंतर सापाची जात विषारी झाली. सर्पदंशापासून वाचण्यासाठीच या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते.