ट्रोलिंगवर बोलली स्वरा भास्कर, म्हणाली – ‘माझे वडील सर्वांत चांगले ट्रोलर’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार स्वरा भास्कर (Swara Bhaskar) नेहमीच इंडस्ट्रीशी संबंधित किंवा समाजातीलही काही मुद्द्यांवर भाष्य करताना दिसत असते. यामुळं अनेकदा ती वादातही सापडत असते आणि ट्रोलदेखील होत असते. अलीकडेच स्वरानं ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. माझा तिरस्कार करणऱ्यांची संख्या जास्त आहे. परंतु त्याबद्दल माझी काहीही तक्रार नाही असं ती म्हणाली आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत ती बोलत होती.

स्वरा म्हणाली, सध्या माझी जी ओळख आहे. ती पाहून मी गर्वानं सांगते की, सोशलवर सर्वांत जास्त तिरस्कार केला जाणारी सेलिब्रिटी मीच आहे. पण मला त्याबद्दल फारसं काही वाटत नाही. माझ्या ट्रोलर्सला हे माहीत नसेल, परंतु मी त्यांची मनापासून आभारी आहे. कारण त्यांच्यामुळं मी कायम चर्चेत असते. माझे वडील माझे सर्वांत चांगले ट्रोलर आहेत, असंही तिनं सांगितलं आहे.

स्वरा म्हणाली, सतत चर्चेत राहण्यासाठी मला कोणत्याही सिनेमाची गरज नसते. कारण माझे ट्रोलर्स सतत मला चर्चेत ठेवण्याचं काम करतात, ज्या कामासाठी आम्ही पीआरची नेमणूक करतो. तेच काम माझे ट्रोलर्स करतात. माझे वडील माझे सर्वांत चांगले ट्रोलर आहेत. ते कायमच मला व्हॉट्सॅप मेसेजमध्ये वगैरे ट्रोल करत असतात. जे ते सोशलवर बोलू शकत नाही ते मला पर्सनली मेसेज करून सांगतात. या फोटोत जाड दिसतेस. खाण्यावर नियंत्रण ठेव वेगैरे ते मला कायम सांगत असतात. तू जाड झाली तर मला काहीही प्रॉब्लेम नाही, परंतु तुझ्या करिअर आणि व्यवसायाचा तो भाग आहे. त्यामुळं सांगतोय असंही ते म्हणतात.

स्वराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती भाग बीनी भाग सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा 4 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ओटीटीवर प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राईमवर रसभरी ही तिची वेब सीरिज अलीकडेच रिलीज झाली आहे. यातील काही सीनवरून वादही झाला. सीरिजमध्ये अनेक बोल्ड सीन्स आहेत. काहींना तर ही सीरिज अजिबात आवडली नाही. तिनं रांझना, तनू वेड्स मनू, नीलबट्टे सन्नाटा, वीरे दी वेडिंग अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

 

You might also like