अहमदनगरच्या १९ उमेदवारांना चिन्ह वाटप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता आज १९ उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. आज ७ उमेदवारांनी माघार घेतली.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये वाकळे नामदेव अर्जुन (बहुजन समाज पार्टी- हत्ती), डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील (भारतीय जनता पार्टी – कमळ), संग्राम अरूणकाका जगताप (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-घड्याळ), कलीराम बहिरू पोपळघट (भारतीय नवजवान सेना पक्ष- डिश एंटिना), धिरज मोतीलाल बताडे (राईट टू रिकॉल पार्टी- ऑटो रिक्षा), फारूख इस्माईल शेख (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष- शिट्टी), सुधाकर लक्ष्मण आव्हाड (वंचीत बहुजन आघाडी- कप आणि बशी), संजय दगडू सावंत (बहुजन मुक्ती पार्टी- खाट),आप्पासाहेब नवनाथ पालवे (अपक्ष- बॅट), कमल दशरथ सावंत (अपक्ष- प्रेशर कुकर), दत्तात्रय आप्पा वाघमोडे (अपक्ष- चावी ), भास्कर फकिरा पोटोळे (अपक्ष- हेलिकॉफ्टर), रामनाथ गहिनीनाथ गोल्हार (अपक्ष- रोड रोलर), शेख आबीद मोहम्मद हनीफ (अपक्ष- किटली ), साईनाथ भाऊसाहेब घोरपडे (अपक्ष- भेंडी ), सुपेकर ज्ञानदेव नरहरी (अपक्ष- गॅस सिंलेडर), संजीव बबन भोर (अपक्ष- दूरदर्शन), संदीप लक्ष्मण सकट (अपक्ष- करनी), श्रीधर जाखुजी दरेकर (अपक्ष- टॅक्टर चालविणारा शेतकरी) यांचा समावेश आहे.