‘प्रायव्हेट’ क्लास घेणार्‍या शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थीनीशी ‘अश्लील’ चाळे, मास्तर ‘गोत्यात’

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – खडकीत खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षणानेच दहा वर्षाच्या मुलीशी असभ्य वर्तन करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिक्षकाला खडकी पोलिसांनी अटक केली आहे.

आसिफ युसूफ शेख (वय ४८,रा. खडकी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडीत मुलीच्या आईने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीत शेख हा खासगी शिकवणी क्लास घेतो. मंगळवारी क्लास सुटल्यानंतर देखील त्याने पिडीत मुलीला थांबविले. त्यानंतर त्याने मुलीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. हा सर्व प्रकार तिने पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी तत्काळ खडकी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, अनुसूचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे हे तपास करत आहेत.

Visit :  Policenama.com