अतिरेक्यांचा केनियातील सैनिक तळावर हल्ला, 3 अमेरिकन ठार

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – सोमालियाच्या अल कायदाशी संबंधित अल शबाब या अतिरेकी संघटनेने केनियाच्या लामू काऊंटी सैनिक तळावर हल्ला केला असून त्यात तीन अमेरिकन सैनिक ठार झाले आहेत. दोन सैनिक जखमी झाले आहेत. केनियातील लामू काऊंटी येथील अमेरिकी आर्मी बेस कॅम्पवर हा आतंकी हल्ला झाला असून तो अल शबाब या संघटनेने केल्याचे अमेरिकेच्या सेना अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमेरिकेने इराणच्या कमांडर कासीम सुलेमानी याला ठार केल्यानंतर इराणने इराकमधील अमेरिकी दुतावास आणि एअरबेसवर रॉकेट हल्ला केला होता.

केनियातील लामू येथील सैनिक तळाचा अमेरिका आणि केनिया सैन्य करीत असते. अतिरेक्यांनी केनियातील लामू येथील किनारपट्टीजवळील सैनिक तळावर हल्ला केला. मंदा हवाई दलाच्या धाव पट्टीवर हल्ला केला. यावेळी झालेल्या चकमकीत ५ अमेरिकन सैनिक ठार झाले तर, दोघे जण जखमी झाले. अतिरेक्यांच्या हल्ल्याला उत्तर देताना अमेरिकन सैनिकांनी पाच अतिरेक्यांना ठार केले आहे.

अल कायदाशी संबंधित अल शबाब या अतिरेकी संघटनेला सोमालियाची राजधानी मोगादिशु मधून माघार घ्यावी लागली होती. संयुक्त राष्ट्राच्या या सैनिक कारवाईत केनियाचे हजारो सैनिक सहभागी झाले होते. त्यामुळे अल शबाब केनियावर हल्ला करत असते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/