Reliance Jio च्या ‘या’ 5 प्रीपेड प्लॅन्समध्ये मिळतील बंपर बेनिफिट्स, जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओकडे प्रत्येक ग्राहक वर्गाच्या गरजेनुसार अनेक चांगले प्लॅन आहेत. जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सला फ्री कॉलिंगशिवाय डेटाचा फायदा दिला जात आहे. आपल्याला 1.5 जीबी डेली डेटा प्लॅन्स जे 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीपासून वर्षाची व्हॅलिडिटी देताे, त्यांच्याबाबत सांगणार आहोत.

रिलायन्स जिओचे टॉप 5 रिचार्ज प्लॅन्स

जिओ 199 रुपयांचा प्लॅन, 42 जीबी डेटा

यामध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 1.5 जीबी डेटा रोज, म्हणजेच एकूण 42 जीबी डेटा मिळतो. याशिवाय नॉन जिओ नंबरवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटांसह 100 एसएमएस रोज मिळतात.

जिओच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकुण 84 जीबी डेटा

या प्लॅनमध्ये 1.5 जीबी डेटा रोज मिळतो, जो 56 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये एकूण 84 जीबी डेटा मिळतो. जिओ टू जिओ अनलिमिडेट कॉलिंग आणि 100 एसएमएस रोज मिळतात.

रिलायन्स जिओ 555 रुपयांच्या प्लॅनमध्ये 126 जीबी डेटा

555 रुपयांच्या या रिचार्जमध्येसुद्धा 1.5 जीबी डेटा रोज मिळतो. जिओ या प्लॅनमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडिटीसह एकूण 126 जीबी डेटा रोज मिळतो.

777 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 131जीबी डेटा

जिओच्या या प्लॅनमध्ये 555 रुपयांच्या प्लॅनचेच बेनिफिट्स आणि व्हॅलिडिटी मिळते. मात्र, 5 जीबी अतिरिक्त डेटासुद्धा मिळतो. 84 दिवसांत एकूण 131जीबी डेटा मिळतो. यामध्ये डिजनी हॉटस्टारची 1 वर्षासाठी व्हीआयपी मेंबरशिप मिळते.

2121 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओचा हा 1.5 जीबी डेटाचा हा प्लॅन 336 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यात डिजनी हॉटस्टार व्हीआयपी सबस्क्रिपशन येते. तसेच 12,000 नॉन जिओ मिनिटांसह 100 एसएमएस रोज मिळतात.

401 रुपयांच्या प्लॅनमध्ये 90 जीबी डेटा

याची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असून, रोज 3 जीबी डेटा मिळतो. 6 जीबी डेटा आणखी दिला जातो. एकूण 90 जीबी डेटा यूजर्सला मिळतो. जिओ-टू-जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्क नंबरवर कॉल करण्यासाठी 1,000 नॉन जिओ मिनिटे मिळतात. जिओ अ‍ॅप्सचे कॉम्प्लीमेंट्री सबस्क्रिपशन मिळते. याशिवाय डिजने + हॉटस्टार चे एक वर्षाचे सबस्क्रिपशन मिळते.