Tobacco Addiction | पार्टनरचे गुटखा खाण्याचे व्यसन सोडवण्यासाठी अवलंबा बडीसोफचा प्रभावी उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tobacco Addiction | कोणत्याही स्वरूपात तंबाखूचे सेवन केल्याने आरोग्याला हानीच पोहोचते. हे एक प्रकारचे विष आहे, जे सेवन करणार्‍या व्यक्तीला हळूहळू मारते. लोक छंद म्हणून याची सुरुवात करतात, पण हळूहळू ते त्यांच्यासाठी व्यसन बनते. ज्यामुळे त्यांची सुटका करणे खूप कठीण होते. अशावेळी जर तुमच्या घरात कोणी गुटखा किंवा तंबाखूचे (Tobacco) कोणत्याही रूपात सेवन करत असेल तर या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी उपाय करून पाहू शकता. (Tobacco Addiction)

 

तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी करा लिंबू आणि बडीशेपचा उपाय –

जर तुम्हाला गुटखा खाण्यासोबत दारू आणि सिगारेट (Alcohol, Cigarette) ओढण्याचे व्यसन असेल तर तुम्ही लिंबू आणि बडीशेपपासून (Lemon, Fennel) तयार केलेल्या या मिश्रणाची मदत घेऊ शकता. हे तयार करण्यासाठी, तुम्हाला 100 ग्रॅम बडीशेप, 10 ग्रॅम ओवा आणि थोडेसे खडे मीठ आवश्यक आहे.

 

या सर्व गोष्टी एकत्र करा आणि त्यात दोन लिंबाचा रस घाला. आता हे मिश्रण तव्यावर गरम करा. हे मिश्रण नेहमी खिशात ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला गुटखा खावासा वाटेल तेव्हा खिशातून थोडेसे मिश्रण काढून खा. हे मिश्रण खाल्ल्याने तुमचे गुटख्याचे व्यसन तर दूर होईलच, सोबतच तुमची पचनक्रियाही (Digestion) चांगली राहील आणि शरीरातील रक्तही स्वच्छ राहील. (Tobacco Addiction)

 

टीप – या मिश्रणाचे कोणतेही दुष्परिणाम नसले तरी वापरण्यापूर्वी एकदा आयुर्वेदिक तज्ञाचा सल्ला घ्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Tobacco Addiction | effective home remedies for tobacco addiction get rid of tobacco eating cravings with fennel seed home remedy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rule Change | आजपासून झाले ‘हे’ 5 मोठे बदल, जाणून घ्या तुमच्या खिशावर कसा वाढला भार

 

LPG Gas Price | दिलासादायक! LPG गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, घरगुती ग्राहकांसाठी दर काय?, जाणून घ्या…

 

Maharashtra Rain | मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज