पुणे ग्रामीणमधील 10 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले. यात नवीन आलेले अधिकारी व विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली झालेले अधिकारी…

पोलीस निरीक्षक मधुकर पवार (मुख्यालय ते आळेफाटा पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक महेश ढवण (नागपूर ते बारामती तालुका पोलीस ठाणे ), सहाय्यक निरीक्षक किरण उंदरे (सोलापूर ग्रामीण ते शिरूर पोलीस ठाणे), सहाय्यक निरीक्षक नेताजी गंधारे (आर्थिक गुन्हे शाखा ते स्थानिक गुन्हे शाखा), सहाय्यक निरीक्षक विनायक देवकर (वेल्हा पोलीस ठाणे ते पौड पोलीस ठाणे), सहाय्यक निरीक्षक अतुल भोस (अप्पर पोलीस अधीक्षक वाचक ते राजगड पोलीस ठाणे), उपनिरीक्षक संदीप गोसावी (बारामती वाचक ते यवत पोलीस ठाणे), महिला उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे (सांगली ते सासवड पोलीस ठाणे), संतोष चामे (सातारा ते वडगाव मावळ पोलीस ठाणे), उपनिरीक्षक विनय झिंजुके (नारायण गाव पोलीस ठाणे ते लोणी काळभोर पोलीस ठाणे)