पोलिस निरीक्षकाशी असभ्य संभाषण करणार्‍या ‘त्या’ पोलिस अधीक्षकांची अखेर बदली

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन –   अकोल्याचे पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची अखेर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी श्रीधर जी हे अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत. अमोघ गावकर यांनी अमरावती येथे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली असून त्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले. राज्य पोलीस दल, गट क्रमांक 4 नागपूरचे समादेशक श्रीधर जी यांना अकोल्याच्या पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी एका पोलिस निरीक्षकास अपमानास्पद वागणुक दिली होती.

अधीक्षकांनी वाटेल त्या भाषेत निरीक्षकास फोनवरून तंबी दिली होती. संबंधित निरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांचे मोबाईलवरील संभाषणाची क्लीप त्यावेळी व्हायरसल झाली होती. पोलिस निरीक्षकाने अधीक्षकांची लेखी तक्रार पोलिस महानिरीक्षकांकडे केली होती. त्यानंतर संबंधित निरीक्षकाची विनंतीवरून दुसरीकडे बदली झाली. आता पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची अकोला येथून उचलबांगडी करण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like