धुळे : पर्यटनासाठी आलेला तरुण ट्रकच्या धडकेत जागीच ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन  – धुळे शहराजवळील लळिंग गावाजवळ महामार्गावर ट्रकच्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला.

सविस्तर माहिती की, आज शनिवारी सायंकाळी महामार्गावर लळिंग गावाजवळ एक विचित्र अपघात घडला. धुळे शहराजवळील 5 कि.मी. अंतरावर असलेल्या लळिंग गावात अतिप्राचिन लळिंग किल्ला आहे. तो पाहण्यासाठी भुसावळहून मित्रांसोबत आलेला विजय गणेश सुर्यवंशी हा राष्ट्रीय महामार्ग क्रं. 3 जवळ मित्रांची वाट पाहत असताना मालेगाहून धुळ्याकडे येणारा ट्रक क्रं. एम. एच. 43 वाय. 5601 लळिंग गावाजवळ आला असता, चालकाचे नियंत्रण ट्रकहून सुटले व ट्रक विजय सुर्यवंशी तरुणावर जाऊन आदळला. ट्रकने तरुणाला काही अंतर फरफटत नेले. स्थानिक लोकांच्या मदतीने तरुणाला ट्रकच्या चाकाखालुन बाहेर काढुन चक्करबर्डी येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

लळिंग किल्ला पर्यटनासाठी विजय सुर्यवंशी सह अन्य तीन ते चार मित्र सोबत आले होते. हा अपघात बधितल्यानंतर मित्रांना मोठा धक्का बसला आहे. अपघाताबाबत मोहाडी पोलीसांत उशीरा पर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like