’मी नेमका काय गुन्हा केला होता की माझी बदली करण्यात आली’ : तुकाराम मुंढे

पोलीसनामा ऑनलाईन टीम : ‘मी नेमका काय गुन्हा केला होता की माझी बदली करण्यात आली’ असा थेट सवाल नागपूरचे माजी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उपस्थित केला आहे. ’ माझ्याविरोधात काही मिळेना म्हणून माझ्या चारित्र्याहिनाचे प्रकार घडवण्यात आले. महिलांना माझ्याकडे आणून कपडे फाडण्याचे प्रकार घडवले गेले’ असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे.

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली असून त्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इथे सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दररोज माझ्याविरोधात आरोप केले जात होते. मला ठरवून टार्गेट केले जात होते.

मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. असे सगळे कोण करणार? ही भाजपचीच लोक होती? दुसरे कोण करणार? असा सवालही यावेळी मुंढे यांनी व्यक्त केला. दरम्यान, मुंढे हे सध्या कोरोनाबाधित असून नागपूरमध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.त्यांच्या या खुलासांमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.