युविका चौधरी-प्रिंस नरूला लवकरच होणार आई-बाबा ? अभिनेत्रीनं सोडलं मौन !

युविका चौधरी (Yuvika chaudhary) आणि प्रिंस नरूला (Prince Narula) टीव्हीच्या बेस्ट कपलपैकी एक आहेत. अलीकडचे एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यानंतर अशी माहिती समोर आली होती की, लवकरच हे कपल आईबाबा होणार आहे. तशी चर्चाही सुरू झाली होती. आता खुद्द युविकानंच यावरील मौन सोडलं आहे आणि याबद्दलचं सत्य सांगितलं आहे.

एका वृत्तपत्रासोबत बोलताना युविकानं सांगितलं की, ती प्रेग्नंट नाहीये. ती नुकतीच एका आजारातून बरी झाली आहे. आधी तर तिला डेंग्यूसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर कोरोना. या दोन्हीमधून ती नुकतीच रिकव्हर झाली आहे. युविकाच्या मते तिच्या प्रेग्नंसीच्या अफवा या खोट्या आहेत आणि हे ऐकून तिला हसू येत आहे.

ज्या आऊटफिटमुळं या अफवा समोर आल्या होत्या त्याबद्दल बोलताना युविका म्हणाली, एखादा अँगल पाहून बेबी बंप वाटत असेल परंतु प्रत्यक्ष मात्र असं काहीच नाही.

युविका म्हणाली, तिला मूल नक्कीच हवं आहे. परंतु सध्या ती वेळ नाहीये. हे तेव्हाच होईल जेव्हा ते होण्याची योग्य वेळ आली असेल असंही तिनं सांगितलं.