उदयनराजेंचा ‘पराभव’ ! श्रीनिवास पाटलांचा 87 हजार 717 मतांनी दणदणीत ‘विजय’

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन –विधानसभेसह पूर्ण राज्याचं लक्ष सातारा लोकसभा पोटनिवडणुकीवर लागलेले आहे.  साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील आमने-सामने आहेत. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली.  जसजशी आकडेवारी समोर येत होती तसतसं उदयनराजे भोसले पराभवाच्या जवळ जाताना दिसत होते. अखेर सर्वात आधी श्रीनिवास पाटील यांनी 14 हजारांची आघाडी घेतली, नंतर 32 हजारांची आणि 81 हजारांची निर्णायक आघाडी घेतली होती. अखेर श्रीनिवास पाटील 87,717 मतांनी वियजी झाले आहेत. त्यांना एकूण 636620 मतं मिळाली आहेत. तर उदयनराजेंना एकूण 548903 मतं मिळाली आहेत.

साताऱ्यातील श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेदरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भर पावसात सभा घेतली. त्यांच्या या कष्टाचं चीज झालं आणि पावसातील सभेचंही मतात रुपांतर झालं अशी चर्चाही होताना दिसत आहे.

उदयनराजेंचं अचानक राजीनामा देणं आणि भाजपवासी होणं जनतेला रुचलं नाही असंही म्हटलं जात आहे. राष्ट्रवादीला साताऱ्याचा बालेकिल्ला राखण्यात यश आलं आहे. सध्या राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षात मोठा जल्लोष केला जाताना दिसत आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणूक निकाल

उमेदवाराचं नावं मतं (%मतदान)

1) श्रीनिवास पाटील 636620 51.04%
2) उदयनराजे भोसले- 548903 44.01%

टीप- मतदानाची आकडेवारी ही निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरून घेतली आहे.

Visit : Policenama.com