Uddhav Thackeray On Eknath Shinde | CM शिंदेंच्या गडाला हादरा? उद्धव ठाकरे म्हणाले – ”लढणारे सैन्य माझ्यासोबत, गद्दारांना…”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray On Eknath Shinde | या लोकांना राजकारणात गाडण्यासाठी तुम्ही सगळे सोबत येत आहात. आई एकविरेचे छत्र आपल्या डोक्यावर आहे. मला खात्री आहे आपण जिंकणार आहोत. यावेळी लढणारे सैन्य माझ्यासोबत असल्याने राजकारणातील गद्दारांना गाडायला मला वेळ लागणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. (Uddhav Thackeray On Eknath Shinde)

आज ठाणे, पालघर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपा आणि शिंदे गटाची साथ सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर २५० पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्याला हादरा देणारा मानला जात आहे. यावेळी भाजपा दिवा उपशहर प्रमुख ज्योती पाटील, पालघरमधील हरिशचंद्र कोलाड यांच्यासह शिंदे गट, भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. (Uddhav Thackeray On Eknath Shinde)

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, पालघर, ठाण्यातील लोकांनी पक्षात प्रवेश केला, हे दृश्य फार दुर्मिळ आहे. कारण सत्ताधारी पक्षाकडे लोक जातात. आज आपल्याकडे लोक येतात. या देशात नव्हे जगात हिंदुहृदयसम्राट म्हणजे बाळासाहेब ठाकरे, पण ही उपाधीही चोरायला बघत आहेत. माझे पालघर भागाकडे दुर्लक्ष झाले हे मला मान्य करावे लागेल.

उद्धव ठाकरे म्हणाले, पोटनिवडणूक लढलो त्यानंतर लोकसभा झाली ती जिंकलो. येणाऱ्या निवडणुकीत भगवा झेंडा कायम ठेवायचा आहे. लवकरात लवकर मी पालघर मतदारसंघातील गाठीभेटींचा दौरा करणार आहे. जनतेला काय पाहिजे हे राज्य सरकारला कळत नसेल तर जनतेचा आवाज कसा पोहचवायचा हे शिवसैनिकांना चांगले कळते.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आज देशात जे वातावरण आहे त्याबाबत जाहीर सभेत बोलेनच. मी व्यक्तीविरोधात नाही तर वृत्तीविरोधात आहेत. ही हुकुमशाही मोडून काढता आली नाही तर पुन्हा डोकं वर काढता येणार नाही. सर्वसामान्य माणसाला गुलाम म्हणून वागावे लागेल. ही गुलामगिरी मला मान्य नाही. मी सर्वसामान्यांना गुलाम होऊ देणार नाही म्हणून मी लढायला उतरलो आहे. पालघरमध्ये तुम्ही वेळ ठिकाण ठरवा, मी तिथे सभेला येतो आणि तिथे तुमच्याशी बोलतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Govt News | खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्ष करण्याचा CM शिंदेंचा विचार

गोडावूनचा ताबा सोडण्यासाठी 17 लाखांची मागणी, पुण्यातील कामगार संघटनेच्या अध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, सहकारनगर व कोरेगाव पार्क परिसरातील घटना

Pune Crime News | लोणी काळभोर, कोंढवा आणि सिंहगड रोड परिसरात घरफोडीच्या घटनामध्ये 9 लाखांचा ऐवज लंपास

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला सरपंचासह पती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

रस्त्यात मिठी मारुन तरुणाला लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले

‘मला सलमान भाई म्हणतात’ पिंपरीत ‘कोयता भाई’ची दहशत

भररस्त्यात महिलेचा दुप्पटा ओढून विनयभंग, दोघांना अटक; लोणी काळभोर परिसरातील घटना

जुन्या भांडणातून भोसरीत तरुणावर सत्तुरने वार, दोघांना अटक

नेट बँकिंगचा पासवर्ड घेऊन महिलेची 15 लाखांची फसवणूक, पुण्यातील शनिवार पेठेतील प्रकार