उद्धव ठाकरेंनी शपथविधीपूर्वीच घेतला ‘हा’ मोठा निर्णय, दिला ‘या’ पदाचा ‘राजीनामा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी सायंकाळी शपथविधी घेणारे शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. होय तुम्ही वाचता आहात ते अगदी खरे आहे. आता म्हणाल की शपथ घेण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा कसा दिला असा प्रश्न तुमच्या मनात येईल. ते उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला हे खरे आहे. त्यांनी राजीनामा दिला आहे तो सामना या शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादकपदाचा राजीनामा दिला आहे.

सामना या वृत्तपत्राचे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे संपादक होते. गेली ७ वर्षे ते सामना चे संपादक होते. संजय राऊत हे कार्यकारी संपादक आहेत. सामना वृत्तपत्रावर कालपर्यंत संपादक म्हणून नाव होते.

महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेत आहेत. त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री आता संपूर्ण राज्याचा नेता असतो. त्यामुळे त्यांनी आता संपादकपदी राहणे योग्य नसल्याने त्यांनी सामना ची संपूर्ण जबाबदारी संजय राऊत यांच्यावर सोपविली आहे. आजच्या सामना वृत्तपत्रातून संपादक म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव वगळण्यात आले आहे.

Visit : Policenama.com