… तर मुख्यमंत्री ठाकरे कधीही राजीनामा देतील, ज्येष्ठ नेत्याचं वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातलं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार पाडण्याची गरज नसून ते आपोआप कोसळेल, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी अनोखे भाष्य करत पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. ‘काँग्रेस, राष्ट्रवादीची मंडळी नीट वागली नाहीत, तर उद्धव ठाकरे कधीही राजीनामा देतील, असं विधान गडाख यांनी अहमदनगरमध्ये व्यक्त केलं.

‘काँग्रेस, राष्ट्रवादीच्या खातेवाटपावरून कुरबुरी सुरुच राहिल्यास उद्धव ठाकरे कधीही राजीनामा देतील. कारण तो राजकारणी माणूस नाही. बाळासाहेब ठाकरे असल्यापासून मी त्यांना ओळखतो. तो शब्द पाळणारा माणूस आहे,’ असं यशवंतराव गडाख यांनी म्हंटले आहे. तसेच ते पुढे म्हणाले कि, काँग्रेस, राष्ट्रवादीचा रोज एक मंत्री रुसतो. कधी या पक्षात, तर कधी त्या पक्षात नाराजीनाट्य सुरु असत. बंगला नीट मिळाला नाही, खातं नीट मिळालं नाही, यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादीत कुरकुर सुरू असते. हे कुठेतरी थांबायला हवं, उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला नसता, तर काँग्रेस विरोधी बाकांवरच राहिला असता, आणि केवळ तोंडाची हवा सोडत राहावं लागलं असतं. पण उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतल्यानं तुम्ही मंत्री झालात. तरीही तुमचं हाच बंगला पाहिजे, आता तरी सुधारा,काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शहाणपणानं वागायला हवं, अश्या शब्दात गडाख यांनी काँग्रेस नेत्यांची कानउघडणी केली आहे.

‘राज्यात आता ग्रामीण भागातलं सरकार आलेलं आहे. ग्रामीण भागातले प्रश्न सोडवायला तुम्हाला कशाला बंगले पाहिजे ? कशाला कार्यालयं पाहिजेत ? राहता कशाला मुंबईतल्या बंगल्यांमध्ये ?’, असे प्रश्न गडाख यांनी उपस्थित केले. मंत्र्यांनी लोकांमध्ये राहायचं असतं, हे कुणीतरी त्यांना सांगण्याची गरज आहे. ग्रामीण भागातलं सरकार असल्यानं ते चालावं अशी अपेक्षा ग्रामीण भागातील शेतकरी आणि बहुजनांची इच्छा असल्याचंदेखील ते म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/