22 व्या वर्षीच कोचिंग क्लास शिवाय IAS बनला हा मुलगा, ‘या’ पध्दतीनं केली UPSC ची तयारी

पाटणा : पोलीसनामा ऑनलाइन  –   बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुकुंद कुमार झा याचा प्रवास खुप काही शिकवतो. मर्यादित साधनात विना कोचिंग एका वर्षाच्या तयारीत पहिल्याच प्रयत्नात आयएएस बनलेल्या मुकुंद कुमारची स्ट्रॅटेजी आणि आतापर्यंतचा प्रवास जाणून घेवूयात…

मुकुंदने आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, जेव्हा तो चौथी-पाचवी इयत्तेत शिकत होता, तेव्हा त्याने आयएएस-आयपीएस शब्द कुठेतरी वाचले होते, तेव्हा त्याने आपल्या वडिलांना याचा अर्थ विचारला. वडीलांनी अर्थ सांगितल्यानंतर जेव्हा तो मोठा झाला तेव्हा आपल्याला हेच बनण्याचे स्वप्न पाहू लागला. आणि पुढे यालाच आपल्या करियरचे लक्ष्य बनवले.

आपल्या कुटुंबाच्या बाबतीत त्याने सांगितले की, माझे वडिल एक शेतकरी आहेत आणि आई अगोदर प्रायमरी स्कूल टीचर होती, नंतर ती नोकरी सोडून मुलांना शिकवू लागली. तिने माझ्या बहिणीला आणि नंतर मला घरीच शिकवले. मुकुंदला आपल्या या प्रवासात खुप अडचणींना तोंड द्यावे लागले, यासाठी कोचिंग जॉइन केली नाही. मुकुंद सांगतो की, मला माहित होते की, वडिलांकडून अडीच-तीन लाख मागितले तर ते देतील, पण नंतर खुप अवघड होईल.

आपल्या सुरूवातीच्या दिवसांबाबत तो सांगता की, त्याने बिहारमध्ये सरस्वती विद्या मंदिरमूधन पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर सैनिक स्कूल गोलपाडामधून 12वीपर्यंत शिक्षण घेतले. नंतर डियूमधून ग्रॅज्यूएशन केले.

ग्रॅज्युएशननंतर वय पूर्ण नव्हते, यासाठी 2018 मध्ये पूर्ण एक वर्ष मला तयारीसाठी मिळाले. नंतर पहिल्यांदा 2019 मध्ये प्रीलिम्स दिली. ही सर्व तयारी त्याने विना कोचिंग केली. मुकुंद सांगतो की, मी स्वताला खुप नशिबवान समजतो की, पहिल्याच प्रयत्नात पास झालो. हां, एक दोन वेळा मला वाटले की आता हे सोडावे, एखादी याच्यासारखीच सोपी परीक्षा देऊयात, नंतर यूपीएससी देऊयात. परंतु नंतर लक्ष्य आठवले. यामुळे शक्ती मिळत होती.

मुकुंदने आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, तो तयारीसाठी टाइम टेबलचे कठोरपणे पालन करत होता. यापूवी मी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहात होतो, नंतर मी फेसबुक, ट्विटर डीअ‍ॅक्टिव्ह केले, मित्र, फॅमिली फंक्शन, लग्न समारंभ सर्व सोडून दिले. प्रॉपर स्ट्रॅटेजी आणि बुक लिस्ट बनवली. नंतर रोज 12 ते 14 तास अभ्यास करून यूपीएससी परीक्षा पास झालो.

22 वर्षाच्या वयात आयएएस बनलेल्या मुकुंदने सांगितले की, यूपीएससीमध्ये हे नाही विचारले जात की तुमच्या शर्टला किती बटने आहेत किंवा किती पायर्‍या चढून आलात. तर युपीएसएसीमध्ये असे प्रश्न विचारले जातात, ज्यातून हे समजते की, तुम्ही तुमच्या देशाला किती ओळखता.