देशभक्ती किंवा धर्म म्हणजे काय, हे सांगणारा भाजप कोण ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशभक्ती किंवा धर्म काय, हे सांगणारा भाजप कोण ? असा सवाल काँग्रेसचा झेंडा हाती घेतलेल्या उर्मिला मतोंडकर यांनी केला आहे. युतीच्या सरकारनंतर देशात विकासापेक्षा हिंसक वातावरण वाढलं आहे असा घणाघातही त्यांनी केला. उर्मिला मातोंडकर यांनी कालच (बुधवार दि २७ मार्च) काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि सक्रिय राजकारणात उतरण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला.

यावेळी बोलताना उर्मिला यांनी अनेक सवालही उपस्थित केले. विकासाची स्वप्न दाखवली गेली. मात्र, प्रत्यक्षात परीकथा नसून पिशाच्चकथा झाली आहे, असा घणाघातही उर्मिला यांनी केला. त्या म्हणाल्या की, “‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावं’ असं म्हटलं जातं. मात्र, हे प्रेम कुठे आहे ? देशात विकास कुठे झाला ? फक्त हिंसक वातावरण वाढलं, विकासाचं चित्र कुठे आहे ? असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत. इतकेच नाही तर, धर्म म्हणजे काय ? खरा देशभक्त कोण ? हे सांगणारे तुम्ही कोण ? जी आश्वासनं दिली गेली, तो काळा पैसा, नोकऱ्या कुठे गेल्या ? असेही उर्मिला यांनी भाजपला विचारले

आपण सामाजिक विषय हातातळे आहेत हे सांगताना उर्मिला म्हणाल्या की, “‘पिंजर’, ‘मैंने गांधी को नहीं मारा’ यासारख्या चित्रपटातून मी सामाजिक विषय हाताळले आहेत. ‘मैंने गांधी को नहीं मारा’ चित्रपटाच्या वेळी आठ वर्षांपूर्वी भाजप सरकार नव्हतं, मात्र, गांधीजींच्या विचारांना कसं मारलं गेलं, हे मी बोलले होते.” असंही त्या म्हणाल्या.

धर्म जात याआधारे विचारेल जाणारे प्रश्न बिनबुडाचे आहेत असे सांगत, महिलांचे प्रश्न, कर, बेरोजगारी, मराठी माणसांचा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचे उर्मिला यांनी सांगितले. निवडणूकांमध्ये प्रचार करून विचारसारणी लोकांपर्यंत पोहचवणार असल्याचं उर्मिला यांनी स्पष्ट केलं आहे.